गुरुद्वारा चौकातील अंडरपासचे काम त्वरीत पुर्ण करा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन

ही बातमी शेअर करा.

गुरुद्वारा चौकातील अंडरपासचे काम त्वरीत पुर्ण करा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन

Pckhabar- बिजलीनगर गुरुद्वारा चौकातील अंडरपासचे काम मुदत पूर्ण होऊन देखील अर्धवटच आहे. या अंडरपासचे काम त्वरीत पुर्ण करावे. अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल यांनी  ब प्रभाग अधिकारी प्रशांत जोशी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक काँग्रेसचे विशाल कसबे, स्वप्नील शिंदे उपस्थित होते.

  सन 2018 पासून प्रभाग क्र.20 येथील बिजलीनगर ते गुरुद्वारा चौक अंडरपास चे काम सुरू असून अद्याप अर्धवट स्थितीमध्ये आहे. या कामाची कालमर्यादा मार्च 2020 होती. परंतु हे काम अजूनही 50 टक्के देखील पूर्ण झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून  निगडी-प्राधिकरण-रावेतला जोडणारा मुख्य रस्ता या कामानिमित्त वाहतूकीसाठी बंद आहे. नागरिकांना पर्यायी म्हणून गल्लीबोळातुन वाहतूक करावी लागत आह. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. व  हा मुख्य रास्ता बंद असल्याने पीएमपीएल बससेवा बंद असून, कामगारांच्या कंपनी बससेवा मार्गावर बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. संथगतीने चालणार्‍या या कामाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या अंडरपासचे काम त्वरीत पुर्ण करावे. अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल यांनी दिला आहे.


ही बातमी शेअर करा.