Pimpri News: शहरात पुन्हा लॉकडाऊन नाही ; आयुक्तांनी केले स्पष्ट

ही बातमी शेअर करा.

शहरात पुन्हा लॉकडाऊन नाही ; आयुक्तांनी केले स्पष्ट
लॉकडाऊन जाहीर झाल्याचे खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
Pckhabar- शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर झाला असून सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, अशी अफवा रविवारी दिवसभर पसरली. शहरात लॉकडाऊन जाहीर झाल्याचे खोटे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे नागरीकांमध्ये मओठ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन जाहीर झाला नसल्याचे स्पष्ट करावे लागले.

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून लॉक डाऊन होणार असल्याची अफवा पसरली होती. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावी, दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही सोशल मीडियावरील मेसेजमध्ये नमुन करण्यात आले होते. या खोट्या मेसेजमुळे व्यापारी तसेच नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे, महापालिका आयुक्तांना स्वतः या अफवेचे खंडन करावे लागले. त्यासाठी शहरात
कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,असे आवाहनही हर्डीकर यांनी केले आहे.


ही बातमी शेअर करा.