संत जिजाबाई कन्या विद्यालयात शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

संत जिजाबाई कन्या विद्यालयात शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
Pckhabar- देहूगाव येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयात शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. लुटे एस. आर. मॅडम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

याप्रसंगी श्री. भंडारे सर, श्री दळवी सर, श्री तांबे सर, श्री माने सर, सौ.मुल्ला मॅडम सौ.भोईटे मॅडम तसेच श्री. विक्रम काळे मामा उपस्थित होते.

शिक्षक दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा, भाषण, गीतगायन श्लोक, निबंध लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धा आॅनलाईन घेण्यात आल्या. या सर्व विद्यार्थिनीचे पर्यवेक्षक श्री तांबे ए.के.सर व मुख्याध्यापिका सौ.लुटे एस. आर. मॅडम यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *