Dehu News : इंद्रायणीच्या घाटावर काव्यमैफीलीत रसिक श्रोते मंत्रमुग्ध

 

Dehu News : इंद्रायणीच्या घाटावर काव्यमैफीलीत रसिक श्रोते मंत्रमुग्ध

Pckhabar- श्री क्षेत्र देहु साहित्य रसिक आयोजित कोजागिरी काव्यसंध्या हा काव्यमैफिलीचा कार्यक्रम देहूत इंद्रायणीच्या घाटावर आनंदात व रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडला.

कार्यकारमाच्या सुरवातीलाच पंचक्रोशीतील
साहित्याची अविरत सेवा करणा-या जेष्ठ साहित्यीकांचा सन्मान आयोजकांच्या वतीने देहु साहित्य भुषण हा पुरस्कार देऊन करण्यात आला.


बिलंदर,पायपिट,राणी लक्क्ष्मीबाईंचे चरित्र यासारखे जवळपास ५१ पुस्तके लिहणारे माजी मुख्याध्यापक श्री पोपटराव भसे गुरुजी व कामगार साहित्यीक ,अजुन पहाट झाली नाही या गाजलेल्या आत्मकथनाते नायक लेखक श्री दादाभाऊ गावडे यांना “देहु साहित्य भुषण “हा पुरस्कार देऊन याप्रसंगी संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे ,देहु नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.घार्गे मॅडम,नगराध्यक्ष स्मिता ताई चव्हाण,नगरसेविका रसिकाताई स्वप्निल आप्पा काळोखे,प्राचार्य प्रदिप कदम सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मुख्य कविसंमेलनाला नारायण पुरी यांच्या बहारदार सुत्रसंचलनाने सुरवात झाली राजकिय,सामाजिक प्रश्नांवर हळुवारपणे आपल्या कवितेतुन ताशेरे ओढणारे जांगडगुत्ता फेम कवी नारायण पुरी यांनी हास्याचा धबधबा असा काही निर्माण केला की श्रोते हसुन लोटपोट झाले.
त्यांची काटा कविता प्रेक्षकांच्या वन्स मोअर वन्स मोअर ची विशेष दाद मिळवुन गेली.

“कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे
आपणच आपली राख उधळीत जाणे”
मि लिहतो म्हणजे निर्भय होतो आहे
जगास पाहण्या डोळे देतो आहे”

ह्या कवीतेच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

पाठ्यपुस्तकात ८वीच्या वर्गाला मराठी विषयात ज्यांची आळाशी नावाची कविता आहे असे अस्सल ग्रामिण साहित्यीक हनुमंत चांदगुडे यांच्या अंतर्मुख करणा-या रचना ऐकुन श्रोत्यांनी त्यांना दाद दिली.

युवा कवी प्रमोद घोरपडे यांच्या हास्य पिकवणार्या प्रेम कविता ,सामाजिकआशयाच्या कविता ,आई वडील या हळव्या विषयांवरच्या कविता विशेष दाद मिळवुन गेल्या.
डॅा स्वप्निल चौधरी (कवी प्रलय) यांनी कर्जबाजारी पणाची जिंदगी जगणारा लढाऊ गण्या आपल्या कवितेतुन मांडला.

कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र देहु साहित्य रसिक व इतर सर्वच सामाजीक संस्थांनी सहकार्य केले.
त्यामध्ये विशेषतः सिंधु जलसेवा ,लायन्स क्लब,इ्ंद्रायणी साहित्यपिठ,अभंग प्रतिष्ठान,इंद्रायणी नेत्रालय,कर्तव्य फाउंडेशन,देहू डॅा असोशियेशन,योग विद्या धाम इ संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.काव्यसंध्येला कोजागिरीचे औचित्य असल्याने रसिक श्रोत्यांसाठी दुधाचेही आयोजन करण्यात आलेले होते.
कुंचलाकार सुनिल हुंडारे यांनी तयार केलेल आकर्षक स्टेज विशेष लक्ष वेधुन घेत होते.

एकाचवेळी हसता हसता ,प्रबोधन करतांना सामाजीक प्रश्नांच्या वर्मावर बोट ठेवणा-या या कविता येणार अनेक महिने श्रोते गुणगुणत राहतील यात तीळमात्र शंका नाही.

या बहारदार कार्यक्रमाचे स्वागत स्वप्निल आप्पा काळोखे सुत्रसंचलन मा सचिनभाऊ कुंभार ,प्रास्तविक प्रा विकास कंद सर यांनी तर आभार Dr Swapnil Chaudhari यांनी मांडले.