Pimpri News : कन्या विद्यालय पिंपरी वाघेरेला कर्मवीर पारितोषिक

ही बातमी शेअर करा.

Pimpri News : कन्या विद्यालय पिंपरी वाघेरेला कर्मवीर पारितोषिक

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

pckhabar – रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील कन्या विद्यालयास कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथी दिवशी विद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल दिले जाणारे कर्मवीर पारितोषिक रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

हे पारितोषिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांना सातारा येथे सर्व सेवकासमवेत प्रदान करण्यात करण्यात आले.

यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, संस्थेचे जनरल बाॅडीचे सदस्य संजोग वाघेरे पाटील, आमदार चेतन दादा तुपे, विभागीय चेअरमन राम कांडगे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, स्कुल कमिटी सदस्य , ग्रामस्थ यांनी मुख्याध्यापिका शारदा शेटे, पर्यवेक्षिका उर्मिला पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.


ही बातमी शेअर करा.