Dehu News : कृष्णपिंगाक्ष प्रोॲक्टिव्ह अबॅकस पाच दिवसीय मोफत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dehu News : कृष्णपिंगाक्ष प्रोॲक्टिव्ह अबॅकस पाच दिवसीय मोफत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar – कृष्णपिंगाक्ष प्रोॲक्टिव्ह अबॅकस इंद्रायणीनगर, देहूगाव येथे सुरू केलेल्या अबॅकसच्या मोफत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

समारोप कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य असलेले अभंग प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष प्रा. विकास कंद, प्रमुख पाहुणे म्हणून कला क्षेत्रात कार्य करणारे अभिनेते राहुल रेड्डी यांच्या उपस्थितीत मुलांना प्रमाणपत्र आणि बक्षिस देण्यात आले.

या पाच दिवसीय मोफत कार्यशाळेसाठी 90 विद्यार्थी उपस्थित होते. या मोफत कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी 60 पालकांनी उपस्थिती लावली. पालकांनाही या मोफत कार्यशाळेबद्दल खूप आनंद वाटला. या मोफत कार्यशाळेला आणि समारोप कार्यक्रमाच्या प्रतिसादाबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांचे कृष्णपिंगाक्ष प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या वतीने अकॅडमीचे संचालक परमेश्वर आंधळे यांनी सर्वांचे आभार मानले.