Chinchwad News : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत छावा मराठा संघटनेचा कुणालाही पाठींबा नाही

ही बातमी शेअर करा.

Chinchwad News : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत छावा मराठा संघटनेचा कुणालाही पाठींबा नाही

जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची भूमिका
Pckhabar -चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सोशल मीडिया, वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांमध्ये छावा मराठा संघटनेचा पाठिंबा असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छावा मराठा संघटनेचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नसल्याचा खुलासा छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन छावा संघटना असून, त्यापैकी किशोर चव्हाण यांच्या छावा मराठा संघटनेने अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. छावा मराठा संघटना या पोटनिवडणुकीत तटस्थतेची भूमिका घेणार आहे, असे रामभाऊ जाधव यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


ही बातमी शेअर करा.