Nigdi News : अनाथ, दिव्यांग मुलांच्या संस्थेला उद्योजक नरसिंग नरवटे यांच्यातर्फे चार फॅन भेट

Nigdi News : अनाथ, दिव्यांग मुलांच्या संस्थेला उद्योजक नरसिंग नरवटे यांच्यातर्फे चार फॅन भेट

Pckhabar- निगडी यमुनानगर येथील अनाथ व दिव्यांग मुलांच्या सेवाभावी संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्योजक नरसिंगभाऊ नरवटे यांच्या वतीने चार फॅन भेट देण्यात आले.


शिक्षकांनी, आता येणाऱ्या उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी खोल्यांमध्ये फॅनची व्यवस्था नसल्याने त्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर उद्योजक नरसिंगभाऊ नरवटे यांच्याशी रमेश शिर्के यांनी संवाद साधला. त्या क्षणी इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये अगदी शून्यातून स्वकष्टाने मोठा उद्योग उभा करणारे, अनेकांच्या हाताला रोजगार मिळवून देणारे, एक आदर्श यशस्वी उद्योजक श्री. नरसिंगभाऊ नरवटे यांनी माझ्या वतीने मी या संस्थेसाठी (१० हजार रुपये किमतीचे) चार फॅन देण्याचे सांगितले.

शिवजयंतीच्या मंगल दिनाचे औचित्य साधून अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये श्री. नरसिंगभाऊ नरवटे यांच्या शुभहस्ते हे फॅन संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले.* याप्रसंगी या संस्थेचे प्रमुख श्री. विश्वनाथ वानखेडे, श्री.काटे महाराज, श्री. रमेश शिर्के, श्री. शरद काळोखे, श्री.सचिन कुंभार श्री.सचिन काळोखे, श्री विकास कंद उपस्थित होते.

नरसिंगभाऊंनी आपले मनोगत व्यक्त करताना, *”मी स्वतःही माझ्या जीवनात प्रतिकूल स्थितीचा सामना करीत, अनेक अडचणींचा संघर्ष करीत एक यशस्वी उद्योजक म्हणून काम करीत आहे. पण हे सर्व काम करताना एक माणूस म्हणून आपण कायम सामाजिक भान जपले पाहिजे व समाजसेवेसाठी कार्य केले पाहिजे. कारण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी समाजाचे आशीर्वाद लाख मोलाचे असतात. ही भावना मी कायम जपली, म्हणूनच यापुढील काळातही अशा सामाजिक कार्यास माझ्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.”* संस्थेच्या वतीने आदरणीय वाघमोडे काकांनी अभंग प्रतिष्ठान व नरसिंगदादांचे आभार व्यक्त केले.