Chinchwad News : सांगवीत आज धनगर समाज सेवा संघातर्फे राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याचे आयोजन

Chinchwad News : सांगवीत
आज धनगर समाज सेवा संघातर्फे राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याचे आयोजन

संघाचे सचिव विजय भोजने यांची माहिती

Pckhabar- पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने आज (रविवारी) राज्यस्तरीय 15 व्या वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाचे सचिव विजय भोजने यांनी दिली.

नवी सांगवीतील रामकृष्ण मंगल कार्यालयात आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हा मेळावा पार पडणार आहे. माजी राज्यमंत्री, आमदार दत्तामामा भरणे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. विधान परिषदेचे आमदार राम शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, माजी महापौर उषा ढोरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाजप प्रवक्ते गणेश हाके, ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, डॉ.नारायण सुरवसे, मल्हार आर्मी प्रदेशाध्यक्ष सुरेशभाऊ कांबळे, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे,  जगदीश होटे, मल्हार सेनेचे लहू शेवाळे, रुक्मिणी गलांडे आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, नांदेड येथील मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्त सुमारे १००० वधू वरानी नोंदणी केली असून मेळाव्याच्या दिवशी सुमारे ४०० च्या आसपास नोंदणी होण्याची शक्यता आहे. वधू वर परिचय पुस्तिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात येणार असल्याचे सचिव विजय भोजने यांनी सांगितले आहे.

कोरोना कालावधीतील निर्बंध शिथिल झाल्याने समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नियोजित वधू-वर व पालक यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मुकुंद कुचेकर यांनी सांगितले.

मेळाव्याच्या संयोजनात अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर, कार्याध्यक्ष दिलीप काटकर, सचिव विजय भोजने, खजिनदार अभिमन्यू गाडेकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र पिसे, संचालक गणेश लंबाते, राजेंद्र कवितके, विठ्ठल कडू, दर्शन गुंड, पांडुरंग उराडे, भास्करराव गाडेकर, रमेश सावळकर, रोहिदास गोरे यांनी पुढाकार घेतला आहे. या वधू-वर मेळाव्यास समाजातील सर्व शाखेतील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.