Dehu News : लायन्स क्लब ऑफ पुणे श्री क्षेत्र देहूगाव या नवीन क्लबचे उद्घाटन आणि शपथ ग्रहण
Pckhabar- लायन्स क्लब ऑफ पुणे श्री क्षेत्र देहूगाव या नवीन क्लबचे उद्घाटन आणि शपथ ग्रहण समारंभ देहूगाव येथील सरस्वती लॉन्स येथे संपन्न झाला.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री राजेश कोठावडे वाईस गव्हर्नर सुनील चेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत क्लबची घोषणा सर्व सदस्यांचा शपथविधी संपन्न झाला. या नवीन क्लब साठी लायन्स क्लब ऑफ चतुर्श्रुंगीचे पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन केले.
श्री किरणभाई पटेल यांची प्रेसिडेंट पदी , श्री संदीप परंडवाल आणि श्री प्रकाश कांबळे यांची वाईस प्रेसिडेंट पदी, श्री गणेश शेवकर यांची सेक्रेटरी, श्री सतीश आवारी यांची उप सेक्रेटरी तर श्री विवेक पटेल यांची खजिनदार पदी अधिकृत निवड करण्या आली.
तसेच श्री प्रदीप भाऊ परंडवाल, श्री योगेश परंडवाल, श्री सुरेश खूर्पे, श्री तुषार परंडवल, श्री हसमुख भाई पटेल, डॉ चंदन बाला , श्री राकेश त्रिवेदी, श्री अशोक परंडवाल डॉ किशोर यादव सर, सौ शिल्पा योगेश परंडवाल, सौ लताबहेन पटेल, श्री पुरुषोत्तम पाटील, श्री वसंत पाटील, श्री अंकित माने या सभासदांनी कार्यभार हाती घेतला.
या कार्यक्रमास श्री अमित टोपरे (सनसेरा ग्रुप ) डॉ. अहेफाज मुलाणी आरोग्य क्रांती प्रतिष्ठान श्री संतोष हगवणे वृक्षदायी प्रतिष्ठान, कर्तव्य फॉउंडेशन चे श्री महेश पवार, माजी प्राचार्य श्री भंडारे सर, योग्य विद्या धाम शाखेचे श्री दत्तात्रय भसे , श्री कासार, श्री बाबू थोरबोले, माजी सरपंच अशोक मोरे, श्री राजेश अण्णा परंडवाल, श्री प्रकाश विधाते, सहदु परंडवाल, श्री रुपेश टिळेकर, श्री जितू भाई पटेल श्री सुनील जाधव आणि ह भ प नंदकिशोर शेवकर आणि देहूतील इतर मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply