Chinchwad News : महापालिका निवडणुकीसाठी सज्ज रहा – शंकर जगताप

ही बातमी शेअर करा.

Chinchwad News : महापालिका निवडणुकीसाठी सज्ज रहा – शंकर जगताप

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी पक्षाच्या चिंचवड-किवळे मंडलातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रविवारी (दि. १३) वाल्हेकरवाडीत आढावा बैठक घेतली. संघटनात्मक बांधणी, मतदान केंद्रावरील बुथ सक्षमीकरण, प्रत्येक बुथवर पक्ष कार्यकर्त्यांच्या नेमणुकीचा त्यांनी माहिती घेतली. तसेच पक्षाच्या बांधणीसाठी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पक्षाचे काम, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

या बैठकीला चिंचवड किवळे मंडलातील माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, सचिन चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, सिध्देश्वर बारणे, अभिषेक बारणे, तानाजी बारणे, माजी नगरसेविका आरती चोंधे, मनिषा पवार, संगीता भोंडवे, भारती विनोदे, माजी प्रभाग स्वीकृत सदस्या विभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, संदीप गाडे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे, शहर भाजपचे उपाध्यक्ष काळुराम बारणे, शेखर चिचंवडे, मधुकर बच्चे, नरेंद्र माने, आदेश नवले, मनोज तोरडमल, राजेंद्र चिंचवडे, धनंजय शाळीग्राम, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, महिला मोर्चा अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर, युवा मोर्चा अध्यक्ष सनी बारणे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत आगज्ञान, सरचिटणीस रविंद्र प्रभुणे, प्रदीप पटेल व मंडलातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले, “पक्ष मजबूतीसाठी बुथ मजबूत असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची नेमणूक करावी. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या बुथवर कमी मते मिळाली होती अशा बुथचे प्राधान्याने सक्षमीकरण करण्यावर भर द्यावे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आली. पाच वर्षांत भाजपने शहर अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. या कामांबाबत जनजागृती झाल्यास पक्षाचे काम लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करावे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्वच योजना कल्याणकारी आहेत. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोहोचले पाहिजे. केंद्र व राज्याच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहावा, असे आवाहनही त्यांनी केले.”

माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.


ही बातमी शेअर करा.