Talegaon Dabhade News : यशवंतनगरच्या युवा कलाकारांच्या सुंदर अविष्कारांनी सजली दीपावली सांज…

Talegaon Dabhade News :
यशवंतनगरच्या युवा कलाकारांच्या सुंदर अविष्कारांनी सजली दीपावली सांज…

तळेगावकर रसिक सुखावले..!

कार्यक्रमाची संकल्पना माजी नगरसेवक निखिल भगत आणि विश्वास देशपांडे यांची

Pckhabar-  यशवंत नगरमध्ये दिवाळी पहाट सुरूवात १३ वर्षापुर्वी झाली ..कै.शामला केळकर कै.विद्याताई अंबिके,विनय कशेळकर,दिपक आपटे,कल्पना भोपळे, विश्वास देशपांडे
या सर्वांनी यशवंत नगर परिसरातील कलाकारांना एकत्र करुन ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि मग मदत करणारे सहविचारी सहभागी झाले..
या दिपावली कार्यक्रमाचे वैशिष्ट्य  म्हणजे या कार्यक्रमाला प्रवेश मुल्य नाही…कुठलीही संस्था नाही इथे कुणाची भाषणे नाहीत की कुणाचा सत्कार नाही इथे कलाकारांचा सत्कार रसिक करतात तो पण पसंतीच्या टाळ्यांनी…

करोना संकटामुळे यशवंत नगरच्या कलाकारांची दिवाळी पहाट गेली २ वर्षे होऊ शकली नव्हती.
यशवंत नगरचे कलाकार यावर्षी दिवाळी पहाट ऐवजी “दीपावली सांज’ या बदललेल्या स्वरुपात रसिकांच्या भेटीला आले..कार्यतत्पर लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक निखिल भगत यांच्या सहकार्याने…..
जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

युवा गायिका योजना पळसुले देसाईच्या सुरेल स्वरातल्या पुरिया धनश्री रागातील बंदिशीने आसमंत भारवला आणि मैफिल रंगायला सुरुवात झाली …आली कुठूनशी कानी …(बाल गायिका स्वराली घोंगडे) शेजारी चित्रपटाले लख लख चंदेरी तेजाची..(सम्राट काशीकर आणि इतर),उंच माझा झोका..,माय भवानी तुझे लेकरू …(आसावरी जहागीरदार) या गण्यानी रसिकांच्या मनाचा ताबा घेतला आणि कडाडून टाळ्याही.
यानंतर अकेताकीच्या बनी इथे…(अनुजा झेंड), मलमली तारुण्य माझे ….( स्वरदा रामतीर्थकर)घागर घेऊन निघाली …ही गवळण ( लक्ष्मीकांत  घोंगडे) मी राधिका …(आसावरी जहागीरदार) या गीतांनी रंगत वाढली. कळीदार कापुरी पान.. जोहार मायबाप जोहार (योजना पळसुलेदेसाई), मला हो म्हणतात पुण्याची मैना…(भाग्यश्री लोहार), काही मी जाऊ मथुरेच्या बाजारी.. आणि राती,अर्ध्या राती…(कविता ठाकूर) या एका पेक्षा एक गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली दीपावली सांज वर कळस चढविला डिपाडी डिपांग….,आई भवानीतुझ्या कृपने…या सम्राट काशीकरच्या दमदार आवाजाच्या गीतांनी. मैफिलीची सांगता जयोस्तुते महन्मंगले …या जोश पुर्ण समूह गीताने झाली .
एल.ई.डी स्क्रीन वरचा डीजीटल डिस्प्ले कार्यक्रमाची कार्यक्रमाची उंची वाढविणारा होता (सम्राट काशीकर)
राजेश झिरपे (सिंथ.), प्रदीप जोशी, लक्ष्मीकांत घोंगडे(संवादिनी)विनय कशेळकर, दीपक आपटे (तबला) आणि विनायक वाकचौरे यांची दमदार ढोलकी यांनी या मैफिलीला तितकीच सुरेल साथ दिली. तेजस्विनी गांधी व विराज सवाई यांचे अभ्यास पुर्ण सुत्रसंचलन लक्ष वेधून घेणारे होते
ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर,सुंदर सजावट व मंडप व्यवस्था शामराव मोहिते, छायाचित्रण सत्यम पाबळकर यांचे होते.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे, माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, केशवराव दाभाडे, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, माजी नगरसेविका कल्पना भोपळे, अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन माजी नगरसेवक निखिल भगत आणि विश्वास देशपांडे यांचे होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निरंजन जहागीरदार, ॲड. संविद पाटील, निलेश जाचक, आनंद कहडणे, सागर मोहिते, चंदन कारके, धीरज सावंत, मिलिंद देशपांडे, गौरव भगत यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रायोजक माजी नगरसेवक निखिल भगत होते.