Pimpri News : शहरातील ३१०० दिव्यांग व्यक्तींचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण

Pimpri News : शहरातील ३१०० दिव्यांग व्यक्तींचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत, दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणेत येतात. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्र.दिव्यांग २०२१/प्र.क्र.४५/दि.क.२ दि.२/१२/२०२१ नुसार दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व वैश्र्विक ओळखपत्र (UDID)  देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविणे बाबत कळविणेत आलेले होते.

त्यानुसार प्लेक्स, पॅम्पलेट, व्हॉटसअप व फेसबुक मेसेज, बॅनर, ऑडीओ, व्हीडीओ सी.डी., मनपाच्या डिजीटल जाहिरात फलकावर तसेच विविध माध्यमाद्वारे व्यापक प्रसिध्दी देणेत आलेली होती.

समाज ‍विकास विभागाकडून दि.१०/५/२०२२ ते दि.१५/०६/२०२२ पर्यंत दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणे, वैश्विक ओळखपत्र (UDID), दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी करणे इ.बाबत शिबीर आयोजित करणेत आलेले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींची एकूण ८०६० एवढी लोकसंख्या आहे त्यापैकी आज अखेरपर्यंत ३१०० इतक्याच व्यक्तींनी दिव्यांग सर्वेक्षण केलेचे दिसून येत आहे.

समाज ‍विकास विभागाकडून जाहीर आवाहन करणेत येत आहे की दि.३१/०८/२०२२ पर्यंत उर्वरीत  दिव्यांग नागरीकांनी दिव्यांग सर्वेक्षण केले नाही तर त्यांचे देण्यात येणारे आर्थिक लाभ बंद करणेत येईल याची नोंद घ्यावी.

तरी दिव्यांग नागरीकांनी आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जावून दिव्यांग सर्वेक्षण लवकरात लवकर करून घेणेत यावे असे आवाहन समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाचे वतीने करणेत येत आहे.