Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर

Talegaon Dabhade News :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर

17 मार्च पर्यंत सुचना, हरकती सादर करण्याची मुदत

Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर झाला आहे. मात्र ओबीसी आरक्षणाच्या गोंधळामुळे नगरपरिषदेची निवडणूक कधी होईल, हे सांगता येत नसल्याने इच्छूक उमेदवारांमध्ये घालमेल सुरू आहे. हरकती व सूचना सादर करण्याची मुदत १७ मार्चपर्यंत आहे.

तळेगाव नगरपरिषदेचे १३ प्रभाग होते. त्यातून २६ नगर सदस्य निवडून आले होते. आता एका प्रभागाची एकने वाढ झाली असून, दोन नगर सदस्य वाढणार आहेत. आता १४ प्रभागांतून २८ नगर सदस्य निवडून येणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार तळेगाव शहराची लोकसंख्या ५६ हजार ४५३ एवढी आहे.

हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करावयाच्या आहेत. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी कळविण्यात येणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने निवडणूक कधी होईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुका सुमारे सहा महिने पुढे गेल्याने नगरपरिषदेच्या निवडणुकाही पुढे जाणार की होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *