Pimpri political News : अजितदादांच्या नेतृत्वाखालील शहरातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्ता देईल : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Pimpri political News : अजितदादांच्या नेतृत्वाखालील शहरातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्ता देईल : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Pckhabar- पिंपरी चिंचवड शहराचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कोपरा न कोपरा माहिती आहे. या शहरातील जनतेला विश्वास आहे की, अजितदादा या शहराला निधी देऊन न्याय देतील. त्यामुळे लोक पुन्हा एकदा अजितदादांच्या नेतृत्वाखाली सत्ता देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचा देखील पाटील यांनी आढावा घेतला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज पाचव्या दिवशी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातील प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता बोलला पाहिजे यासाठी ही संवाद यात्रा सुरू केली आहे. नव्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी कार्यकर्त्यांची कार्यकारिणी मोठी असली पाहिजे. पक्ष चांगल्या पद्धतीने चालवला पाहिजे. बूथ कमिटीच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. प्रसंगी लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवायला हवी, असे मार्गदर्शन ना. जयंत पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे , महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट , माजी महापौर संजोग वाघेरे, युवती जिल्हाध्यक्ष वर्षा जगताप , युवक जिल्हाध्यक्ष इमरान शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष यश साने, वसंत बोराटे, संध्या सोनवणे, निलेश पांढरकर, सचिन चिंचवाडे, उत्तम आल्हाट आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *