Port Bleyer News: *”भाषाशुद्धी हीच सावरकरांना आदरांजली!”*

Port Bleyer News: *”भाषाशुद्धी हीच सावरकरांना आदरांजली!”*
Pckhabar- “साहित्यिकांनी आपल्या अभिव्यक्तीतून भाषाशुद्धीचा आग्रह धरणे हीच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली ठरेल!” असे मत ज्येष्ठ साहित्यिक माधुरी ओक यांनी कालापानी संग्रहालय सभागृह, पोर्ट ब्लेअर, अंदमान येथे बुधवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी व्यक्त केले.
ओम साई ट्रॅव्हल्स आयोजित पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांच्या खास सहलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. प्रकाश ननावरे, राजेंद्र पगारे, विनायक कुलकर्णी, कालापानीच्या व्यवस्थापिका शीलाकुमारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रदीप गांधलीकर यांनी सावरकरांच्या क्रांतिकार्याची विस्तृत माहिती दिली. एकनाथ उगले यांनी सावरकरांच्या कवितांचे वाचन केले. रजनी अहेरराव यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्मीळ गोष्टी कथन केल्या. शरद काणेकर, शरयू पवार, उज्ज्वला केळकर, संध्या गांधलीकर, मनीषा उगले, सीमा धोपाडे यांनी संयोजनात सहकार्य केले. राज अहेरराव यांनी सावरकरांनी मराठी भाषेत रूढ केलेल्या शब्दांची माहिती दिली आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कैलास भैरट यांनी आभार मानले.