Big News : 1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
Pckhabar- तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्ण संख्या काही प्रमाणात कमी- जास्त होत असतानाच 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी थोड्या वेळापूर्वीच माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. महाविद्यालयात येताना विद्यार्थ्यांनी दोन्ही लसीकरण केलेले असणे आवश्यक आहे.
दरम्यान, काल सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता महाविद्यालयेही सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यातली महाविद्यालये सुरू करताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता कोरोनाची तिसरी लाट आल्याने धोका अजून वाढला आहे, मात्र बऱ्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याबाबत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबाबत शासन सकारात्मक होते, त्याच अनुशंगाने हा निर्णय आज घेण्यात आला आहे. मुख्यमंंत्र्यांनी राज्यातली महाविद्यालये सुरू करण्यास आता हिरवा कंदील दाखवल्याने कॉलेज कॅम्पस पुन्हा बहरणार आहेत.










Leave a Reply