Election News : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी गुरूवारी आरक्षण सोडत
देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे नगरसेवकांचे लक्ष
Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीसह राज्यातील 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत येत्या गुरुवारी ( दि. 27) मुंबई येथे मंत्रालयात दुपारी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहे. याबाबत राज्य नगर विकास विभागाच्या सह सचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी आदेश काढला आहे.
राज्यातील 139 नगरपंचायतीची दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष तर एक भाजपचा नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगरसेवक नगराध्यक्ष होणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत ही ऑनलाईन होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन आरक्षण सोडत होणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपंचायतीचे 10 नगरसेवकांना ऑनलाईन सोडतीसाठी उपस्थित राहता येणार आहे.










Leave a Reply