Maharashtra News : शरद पवार कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अंबाबाई चरणी प्रार्थना

Maharashtra News : शरद पवार कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अंबाबाई चरणी प्रार्थना

Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर काही वेळातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पवार साहेब कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी फेसबुकवर पोस्ट करत अंबाबाई चरणी प्रार्थना केली आहे.

ज्येष्ठ नेते पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वत: ट्विट करुन त्यांनी थोड्यावेळापूर्वीच दिली आहे.

त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवर काही वेळातच एक पोस्ट केली असून ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात” शरद पवारजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त नुकतेच समजले. ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू व्हावे, यासाठी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *