Pimpri News : फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत शरद पवार यांनी केला मेट्रोतून प्रवास

Pimpri News : फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत शरद पवार यांनी केला मेट्रोतून प्रवास

Pckhabar-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज (सोमवारी) सकाळी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. तसेच फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत त्यांनी मेट्रोने प्रवास केला.

पवार यांच्या समवेत मेट्रोचे ब्रीजेश दिक्षीत, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार विलास लांडे, प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, शहर सरचिटणीस फजल शेख आदी उपस्थित होते.

स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची संपूर्ण माहिती पवार यांनी घेतली. डेमोही घेतला. मेट्रोने फुगेवाडीपासून पिंपरीपर्यंत प्रवास केला. पुढल्या टप्प्यांबाबतही पवार यांनी मेट्रोच्या अधिका-यांकडून माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *