Maharashtra News :
We Maratha संघटनेच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

Pckhabar- राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती शहाजीराजे भोसले यांचे मूळ गाव असलेल्या वेरूळ येथील शहाजिराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर
We Maratha संघटनेच्या वतीने
उत्साहात साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस आम्ही मराठा संघटनेचे महाराष्ट्र राज्यप्रमुख अंगद अप्पासाहेब भिंगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संघटनेचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष समाधान नवले, उपाध्यक्ष दादासाहेब आव्हाळे, नितिन तवार, शिवम भुसारे यांच्यासह जिल्ह्यामधील सर्व तालुकाप्रमुख, उपप्रमुख व इतर पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्यप्रमुख अंगद अप्पासाहेब भिंगारे यांनी संघटनेतील नवनिर्वाचित पदाधिकार्यांना बाल शिवाजी व जिजाऊ माँ साहेबांची प्रतिमा भेट म्हणून दिली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकार्यांना संघटनेबद्दल मार्गदर्शन केले.
जिजाऊ जयंती साजरी करण्यासाठी आम्ही मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध शिवाजी शेलार, उपाध्यक्षा स्नेहल कदम, विशाल बोरसे, संदीप निर्मळ, माऊली इंगले, विनायक पाटील, पुजा शिंगार, रणजीत जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संघटनेचे जिल्हाप्रमुख समाधान नवले यांनी आलेल्या सर्व पदाधिकार्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दरम्यान, आम्ही मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध शिवाजी शेलार म्हणाले” राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी मोठ्या शौर्याने, ध्यैर्याने, संयमाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. माँसाहेबांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला, राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरणा दिली. कुठल्याही संकटावर मात करण्याचे बळ दिले. अशा शब्दात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे स्मरण करुन शेलार यांनी जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन केले.”











Leave a Reply