Dehugaon political News : नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी!

ही बातमी शेअर करा.


Dehugaon political News : नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी!

17 जांगासाठी तब्बल 61 जण इच्छूक

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीचे नगरसेवक होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी 17 जागेसाठी तब्बल 61 जण इच्छूक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे.

देहूगाव नगरपंचायतसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच अभंग मंगल कार्यालयात झाल्या. आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, देहू शहराध्यक्ष प्रकाश लावणे, ज्येष्ठ नेते विठ्ठल शिंदे, महिला अध्यक्षा शीतल हगवणे, सुभाष जाधव यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

नव्याने झालेल्या देहूनगरपंचायतीच्या प्रथम सदस्य होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे तिकीट देताना वरिष्ठांची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. तसेच ज्यांना तिकीट मिळणार नाही ते बंडखोरी करण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

नगरपंचायतीच्या जागांसाठी सतरा प्रभागातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. मात्र, प्रत्येक प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. प्रभाग एकमधून पाच इच्छुक असून प्रभाग दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकही इच्छुक नाही. प्रभाग तीनमधून चार आणि प्रभाग चार पाचमधून प्रत्येकी सहाजण इच्छुक आहेत. प्रभाग सहामधून दोन, प्रभाग सातमधून पाच, प्रभाग आठमधून एक, प्रभाग नऊमधून तीन, प्रभाग दहामधून पाच इच्छुक आहेत.

प्रभाग अकरामधून चार, प्रभाग बारामधून तीन, प्रभाग तेरामधून एक, प्रभाग चौदामधून तीन, प्रभाग पंधरामधून सहा, प्रभाग सोळामधून तीन इच्छुक आहेत. तर प्रभाग सतरामधून चार जण इच्छुक आहेत.

दरम्यान, निवडणुकीसाठी इच्छुकांमध्ये माजी सरपंच कांतिलाल काळोखे, रत्नमाला करंडे, पूनम काळोखे, सुनीता टिळेकर, ज्योती टिळेकर, उषा चव्हाण यांनी मुलाखती दिल्या आहेत. तर माजी उपसरपंच अभिजित काळोखे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य संदीप शिंदे, योगेश परंडवाल, सचिन विधाटे, राणी मुसुङगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या देहूगाव महिलाध्यक्षा वैशाली टिळेकर, प्रा. विकास कंद, प्रदीप काळोखे, चंद्रशेखर परंडवाल, सोमनाथ चव्हाण, आकाश घोगरे, स्मिता चव्हाण, माया टिळेकर, व इतरांचा समावेश आहे.


ही बातमी शेअर करा.