


Mumbai News: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मध्यरात्री ईडीकडून अटक

Pckhabar- माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची 14 तास चौकशी करून मध्यरात्री एक वाजता अटक करण्यात आले. त्यांना आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

‘ईडी’च्या संभाव्य कारवाईच्या विरोधात न्यायालयीन लढाईत अपयश आल्यानंतर देशमुख सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. अखेर रात्री एकच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. आज सकाळी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

दरम्यान, ईडीने दिवाळीतच देशमुख यांना अटक केल्याने देशमुख यांची दिवाळी जेलमध्ये जाणार आहे. तर देशमुख यांची अटक ही महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.










Leave a Reply