

Chikhali Crime News : चारित्र्याच्या संशयातून विवाहितेच्या अंगावर ओतले गरम पाणी

Pckhabar-चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेच्या पायावर गरम पाणी ओतून शारिरीक आणि मानसिक छळ करणार्या सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यातील उंड्री येथे घडला.

34 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मोहम्मद रयान कुट्टी (वय-36), दोन महिला आरोपी, फारूक बागवान (वय-37, सर्व रा. हिल व्हयु सोसायटी, उंड्री, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद हा फिर्यादी यांचा पती असून त्याला इतर आरोपी खोटी माहिती देत होते. त्यावरून आरोपी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आरोपीने त्यांचा मोबाईल नंबर ब्लॉक करून मानसिक त्रास दिला. तसेच महिला आरोपीने त्यांच्या पायावर गरम पाणी ओतून शारिरीक छळ केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply