Dehugaon News : कवी लखन जाधव यांच्या “कवितांचा गाव” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

ही बातमी शेअर करा.

Dehugaon News : कवी लखन जाधव यांच्या “कवितांचा गाव” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Pckhabar- देहू येथे सुरू झालेल्या इंद्रायणी आहे साक्षीला या साहित्य चळवळीतील नवोदित कवी लखन जाधव यांच्या “कवितांचा गाव” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देहू येथे इंद्रायणीतीरी ज्येष्ठ कवी दादाभाऊ गावडे, डॉ. स्वप्निल चौधरी यांच्या हस्ते संतोषजी गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

सर्वसामान्य कुटुंबातील एका कवीने स्वतःचे पुस्तक प्रकाशन करण्यापर्यंत प्रयत्न करणे हे निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत या वेळी इंद्रायणी आहे. साक्षीला या साहित्य चळवळीचे प्रणेते डॉ. अहेफाज मुलाणी यांनी मांडले, तसेच कवी लखन जाधव यांना पुस्तक निर्मितीबद्दल शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सांगता इंद्रायणी आहे साक्षीला या मासिक कविसंमेलनाने झाली आहे. ज्यात डॉ. विवेक मोरे, सुनिल हुंडारे, प्रा. कुलदीप चव्हाण, महेश मोरे, ज्येष्ठ कवी दादासाहेब आंगवणे, विजय चव्हाण, शुभम शिंदे, कवयित्री वृषाली आढाव, सविता दिवेकर, ज्योती सावंत, स्वाती नेवे आदी कवींनी आपल्या रचना सादर केल्या.

इंद्रायणी आहे साक्षीला हा कवीमंच अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. परिसरातील कवींनी यात नियमितपणे सहभागी होण्यासाठी ९८२२५५८९६७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मंचातर्फे करण्यात आले आहे.


ही बातमी शेअर करा.