Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशवासियांना संबोधित करणार

Pckhabar- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार असून नेमकी कोणती घोषणा करणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार असल्याची माहिती PMO कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमके कोणत्या विषयावर भाष्य करणार आहेत याबाबत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, भारताने 100 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे आणि ही मोहिम अद्यापही सुरू आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाष्य करुन वैद्यकीय यंत्रणांची पाठ थोपवण्याची शक्यता असून जनतेचेही कौतुक करणार असल्याचे बोलले जात आहे.










Leave a Reply