Pimpri News : प्रहार जनशक्ती पक्ष पिंपरी, पुणे महापालिका निवडणूक  लढवणार : अनिल गावंडे


Pimpri News : प्रहार जनशक्ती पक्ष पिंपरी, पुणे महापालिका निवडणूक  लढवणार : अनिल गावंडे

Pckhabar- प्रहार जनशक्ती पक्ष पिंपरी- चिंचवड, पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांनी जाहीर केले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष विनोद जगन्नाथ गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी पत्रकाराशी बोलत असताना अगामी निवडणूका पक्ष पुर्ण ताकदीने लढणार आहे असे सांगितले.

प्रहार नावातच सर्व काही असल्याने सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्ष येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनिल गावंडे यांनी सांगितले.  पक्षाची आढावा बैठक शासकीय निवासस्थानी राजगड पुणे येथे घेण्यात आली त्या वेळी त्यांनी बोलताना सांगितले,  राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांचे विचार तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रहार ची पाळेमुळे खोलवर रुजवली पाहीजे असे ही ते म्हणाले,  पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्ष  साधारण चाळीस जागा लढवणार आहे,  व पुणे जिल्हा स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रहार चा प्रवेश  निश्चित आहे, दिव्यांग, अनाथ , शेतकरी,  विधवा, कामगार मजुर वर्ग यांचे साठी ना. बच्चु भाऊ कडु यांचे कार्य संपुर्ण महाराष्ट्रास ज्ञात आहे,  त्यांचे विचार हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रहार च्या कार्यकर्त्यांनी झटण्याची गरज आहे,  प्रहार जनशक्ती पक्षाची सदस नोंदणी सुरु असुन जास्तीत जास्त सदस्य प्रहार शी जोडण्यात यावे,  सामाजिक कार्य करत असताना सत्तेत सहभाग असणं ही आवश्यक आहे व त्या साठी निवडणूकीत  जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता पासुन च कामाला लागावे, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्षश्री बापुसाहेब नवले हे सातत्याने प्रयत्नशील असल्याने ग्रामीण भागातही प्रहार चा झेंडा फडकवल्या शिवाय राहणार नाही असे ही गावंडे यांनी सांगितले.

या वेळी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री ॲड अनंत काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री बापुसाहेब नवले पाटील, पुणे जिल्हा श्री मार्गदर्शक तथा माजी शहरध्यक्ष नंदकिशोर जगदाळे सर,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री विनोद भाऊ गायकवाड, शिरूर तालुका अध्यक्ष श्री ॲड राहुल वाळके, खेड तालुका कार्याध्यक्ष श्री सुनील जाधव, आंबेगाव तालुका अध्यक्ष श्री जितेंद्र भालेराव इंदापूर भोर तालुका अध्यक्ष श्री संतोष मोहिते, पुरंदर तालुका अध्यक्ष ॲड महादेव कापरे, दौंड तालुका अध्यक्ष श्री रमेश शितोळे, जुन्नर तालुका अध्यक्ष श्री संतोष कबाडी, कामगार आघाडी, विद्यार्थी आघाडी,शेतकरी, संघटने चे अनेक पदाधिकारी व महिला आघाडी चे पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *