Pimpri Crime News : आरोपीची एक चूक अन् खुनातील आरोपी गजाआड

ही बातमी शेअर करा.

Pimpri Crime News : आरोपीची एक चूक अन् खुनातील आरोपी गजाआड

Pckhabar- आई-वडीलांसोबत सततच्या होणाऱ्या भांडणामुळे तरूणाने शेजाऱ्याचा धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. आरोपीच्या अंडरवेअरमुळे
हिंजवडी पोलीसांनी गजाआड केले आहे.

संतोष विश्वनाथ माने (वय ३८, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. कैलास अंकुश डोंगरे (वय २३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोषची पत्नी सरस्वती माने (वय ३५) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माने कुटूंबिय आणि आरोपी कैलास याचे कुटूंब हिंजवडीतील साखरे वस्ती येथे तुषार साखरे यांच्या चाळीमध्ये
शेजारी राहतात. संतोष आणि त्याच्या पत्नीचे आरोपी कैलासच्या आई-वडीलांसोबत सतत भांडण होत असे. या भांडणाला वैतागून कैलासने रविवारी सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान संतोष माने यांच्या कपाळावर धारदार हत्याराने वार करून त्यांचा खून केला. खुनाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आजुबाजूला चौकशी केली असता या ठिकाणी बाहेरून कोणी आले नव्हते. तपास करत असताना सहायक फौजदार बंडू मारणे यांना शेजारी राहणाऱ्या कैलासची अंडरवेअर घराबाहेर वाळत टाकली असल्याचे निदर्शनास आले. इतर सर्व कपडे सुकलेले असताना फक्त अंडरवेअर ओली असल्याने पोलीसांना संशय आला. कैलासकडे कसून चौकशी केली असता त्याने
गुन्ह्याची कबुली दिली. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.