Pimpri News : स्कूल चले हम…! नवमहाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत

ही बातमी शेअर करा.

Pimpri News : स्कूल चले हम…! नवमहाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत

Pckhabar- शासनाने जारी केलेल्या निर्देशाचे पालन करून नवमहाराष्ट्र विद्यालयात इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्याचे सोमवारी उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी सर्व शिक्षकवृंद व पर्यवेक्षक शरद परदेशी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान मोजून व सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच वर्गामध्ये सोडण्यात आले. मास्क व योग्य अंतर ठेवून वर्गामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली.

विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील, उपमुख्याध्यापक पी.एम. शेख, पर्यवेक्षिका शुंभागी गमे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नियमाचे पालन करण्याचे व नियमित येण्याचे आवाहन केले, व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख निता शेटे यांनी केले.


ही बातमी शेअर करा.