Dehugaon News : माजी विद्यार्थ्यांतर्फे संत तुकाराम विद्यालयासाठी सॅनिटायझर

ही बातमी शेअर करा.

Dehugaon News : माजी विद्यार्थ्यांतर्फे संत तुकाराम विद्यालयासाठी सॅनिटायझर

Pckhabar-कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आज (सोमवार) पासून सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप ही असल्यामुळे विद्यार्थ्यांचे कोरोना पासून बचाव होण्यासाठी तीर्थक्षेत्र देहूगावातील संत तुकाराम विद्यालयासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन विद्यालयासाठी सॅनिटायझर भेट दिले.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांनी विद्यालयाचे प्राचार्य प्रा. यादव सर, उपप्राचार्य भंडारी सर, पर्यवेक्षक कांबळे मॅडम आणि शिक्षक वृंद यांच्याकडे सॅनिटायझर सुपूर्द केले. यावेळी माजी विद्यार्थी अजित काळोखे, ओंकार महाराज काळोखे, श्रवन हगवणे उपस्थित होते.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे म्हणाले ” शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि अविस्मरणीय ठेवा असतो. परंतु गेली दिड वर्ष कोरोना संसर्गामुळे शाळा बंद होत्या. यामूळे शालेय जीवन गेली दिड वर्ष विद्यार्थ्याना अनुभवता आले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आजपासून शाळा पुन्हा सूरू झाल्या असून दिड वर्ष घरी असेलेले विद्यार्थी आज आनंदाने आणि उत्साहाने पुन्हा शाळेत दिसले.
विद्यार्थ्याच्या याच आनंद आणि उत्साहावर कोरोना संसर्गाने घाला घालू नये म्हणून आणि संसर्गाची प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संत तुकाराम विद्यालयासाठी सॅनिटायझर भेट देण्यात आले. शाळा पुन्हा सूरू झाल्याने विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील झळकत असलेला आनंद आणि उत्साह असाच द्विगुणित होऊन विद्यार्थ्यानी पुन्हा शालेय जिवनाचा मनमुराद आनंद घ्यावा, असेही काळोखे म्हणाले.”


ही बातमी शेअर करा.