Chikhali News : घरकुलमधील सदनिकांची पुन्हा तपासणी ; ७२१ सदनिका बंद, ८३ सदनिकांमध्ये भाडेकरू

ही बातमी शेअर करा.

Chikhali News : घरकुलमधील सदनिकांची पुन्हा तपासणी ; ७२१ सदनिका बंद, ८३ सदनिकांमध्ये भाडेकरू
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथे विकसित करण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या घरकूल योजनेतील यापूर्वी बंद आढळलेल्या १२४२ सदनिकांचे पुन्हा सर्वेक्षण आज (शनिवार) करण्यात आले आहे. त्यामध्ये ७२१ सदनिका बंद तर ८३ सदनिकांमध्ये भाडेकरू आढळून आल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाला बंद सदनिकांची पुन्हा तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्यासह वीस कर्मचाऱ्यांनी ही पुन्हा तपासणी केली.

यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी सर्व सदनिकांची तपासणी केली होती. त्यामध्ये १२४२ सदनिका बंद आढळून आल्या होत्या. त्याची तपासणी आज केली. त्यामध्ये ७२१ सदनिका पुन्हा बंद तर ८३ सदनिकांमध्ये भाडेकरू राहत असल्याचे आढळून आले. ४३८ सदनिकांमध्ये सदनिकाधारक स्वत: राहत असल्याचे आढळून आल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.


ही बातमी शेअर करा.