Dehu News: देहूगावात स्वराज्य ध्वजाचे स्वागत, पूजन

ही बातमी शेअर करा.

Dehu News: देहूगावात स्वराज्य ध्वजाचे स्वागत, पूजन
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या ‘स्वराज्य ध्वजाचे’ बुधवारी तीर्थक्षेत्र देहूगाव येथे पूजन करून स्वागत करण्यात आले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिराच्या महाद्वारासमोर श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे यांच्या हस्ते प्रतिकात्मक ध्वजाचा पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. देहू राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष योगेश मोरे, सोशल मीडिया अध्यक्ष अमित घेणंद, महिलाध्यक्षा वैशाली टिळेकर, पंचायत समिती सदस्य हेमलता काळोखे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्या राणी मुसूडगे, गीता मोरे, सचिन कुंभार, सचिन विधाटे, बाळासाहेब काळोखे, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, प्रा. विकास कंद, सचिन काळोखे, संपत दाभाडे आदी उपस्थित होते.

धार्मिक, अध्यात्मिक समानतेचा, सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा, तरुणाईच्या उत्साहाचे प्रतीक असणारे, ऊर्जा वाढविणारा, सकारात्मक विचार व प्रेरणा देणारा देशातील सर्वात उंच ७४ मीटर उंचीच्या १८ टन वजनाच्या स्तंभावर, ९६ फूट लांब आणि ६४ फूट रुंदीचा ९० किलो वजनाचा असणारा भगव्या स्वराज्य ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्डा येथील शिवपट्टण किल्लाच्या समोर उभारण्यात येणार आहे.

 


ही बातमी शेअर करा.