Dehugaon News: लसीकरण अभियानात 1 हजार 89 नागरिकांचे लसीकरण

ही बातमी शेअर करा.

Dehugaon News: लसीकरण अभियानात 1 हजार 89 नागरिकांचे लसीकरण
Pckhabar- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून देहूतील 5 लसीकरण केंद्रांवर आज (बुधवार)लसीकरण अभियान राबविण्यात आले. यामध्ये 1089 नागरिकांनी लस घेतली. पुढील तीन दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या विशेष प्रयत्नातून 5000 हजार लस उपलब्ध करून दिली.

श्रीक्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेचे गांभिर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष देहू शहराच्या वतीने मोठ्या प्रमाणात महालसीकरण अभियान मोहीम राबविण्यात आली. या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, जिल्हाध्यश गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, नगरसेविका अश्विनी जाधव, संतोष जाधव, बाळासाहेब काळोखे उपाध्यक्ष भाजप पुणे जिल्हा, शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, संभाजी टिळेकर उपाध्यक्ष मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा, माजी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, संतोष हगवणे, अध्यक्ष संजय जंबुकर, व्हाइस चेअरमन नारायण तात्या पचपिंड, सरचिटणीस सागर मुसूडगे, सरचिटणीस गणेश खंडागळे, संदिप दिवाणराव परंडवाल, संतोष चव्हाण उपाध्यक्ष रिपाइं पुणे जिल्हा, सचिन काळोखे उपाध्यक्ष भाजप देहू, सचिन मराठे, सत्यवान जाधव, निलेश मोरे, वैभव मोरे, पोपट पवार, प्रफुल्ल टिळेकर सरचिटणीस भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा, गणेश शेवकर, रायबा मोरे,सुदाम भाऊ मराठे उपाध्यक्ष किसान आघाडी मावळ तालुका, प्रकाश भाऊ टिळेकर मा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, अनिरुद्ध काळोखे अध्यक्ष युवा मोर्चा, सुजाता माने अध्यक्ष महिला मोर्चा, सोनाली घोडेकर राष्ट्रीय सचिव नरेंद्र मोदी विचार मंच, सुनील घोडेकर राष्ट्रीय महामंत्री नरेंद्र मोदी विचार मंच आदी दाधिकारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


ही बातमी शेअर करा.