Delhi News : केंद्र सरकारचा नवीन उपक्रम; असे काढा डिजिटल हेल्थ कार्ड
Pckhabar-‘आयुष्मान भारत राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन’ या योजनेत अंतर्गत नागरिकांसाठी डिजीटल हेल्थ कार्डची सोय करण्यात आली आहे.
आयुष्मान भारत राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन’ या (NDHM) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले आहे. मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना या मोहिमेची घोषणा केली होती. सुरवातीला ही योजना सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहे.
याद्वारे आरोग्य व्यवस्था डिजीटल माध्यमातून सर्वांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागात पोहोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याद्वारे देशातील साऱ्या सरकारी रुग्णालयांना डिजीटल आरोग्य यंत्रणेशी जोडले जाईल आणि नागरिकांना त्यांचा ‘हेल्थ आयडी’ सांगताच दुसऱ्या राज्यातील सरकारी रुग्णालयांतही आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल. सरकारच्या कल्पनेप्रमाणे, या योजनेत प्रत्येक नागरिकांचा एक ‘आरोग्य ओळख क्रमांक तयार करण्यात येईल. त्याच्या आधारे प्रत्येकाचे डिजीटल हेल्थ कार्ड तयार होईल. यामुळे रूग्णांना डॉक्टरांकडे जाताना प्रत्येक वेळी आपली फाईल घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. डॉक्टरांनाही एका क्लिकवर संबंधित रूग्णाचा आरोग्य इतिहास आणि प्रकृतीतील चढउतार पाहण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
असा मिळवा हेल्थ आय डी
●Healthid. Ndhm.gov. in या लिंकवर जा.
तेथे तुमची सर्व माहिती भरा.
नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, जन्मतारीख, पूर्ण पत्ता, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवा.
यानंतर एक ओटोपी तुमच्या मोबाईलवर येईल.
तो नोंदविल्यावर पुन्हा एक ओटीपी येईल. तो टाकल्यावर तुमची नावनोंदणी पूर्ण झाल्याचा संदेश येईल.
त्यात तुमचा १४ आकडी हेल्थ आय डी दिलेला असेल.
ही प्रक्रिया २८ ते ३० सेकंदांत होईल.










Leave a Reply