Dehuroad News : संकटकाळातील कोरोना योद्ध्यांचे कार्य उल्लेखनीय : दीपक भोंडवे

ही बातमी शेअर करा.

Dehuroad News : संकटकाळातील कोरोना योद्ध्यांचे कार्य उल्लेखनीय :
दीपक भोंडवे
रावेतला कोरोना योद्ध्यांचा गौरव
Pckhabar- कोरोना संकट काळात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून कोरोना योद्ध्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या  योद्ध्यांमुळे सर्वसामान्यांना अडचणीच्या काळात मोठा आधार दिला, असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते  दीपक मधुकर भोंडवे यांनी काढले.

जगातिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून कोरोना संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसेवा करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध कोरोना योद्ध्यांचा सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
रावेत येथील समीर लॉन्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आरएमडीच्या औषध निर्माण शास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक  डॉ. संजय वालोंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य  सचिन दांगट होते. अखिल भारतीय फार्मासिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष दत्ता खराटे, रत्नाकर करंकाळ आदी उपस्थित होते.

प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान

कोरोना योद्धे  गणेश आंधळे, सुनील काकड, अभिजित पाटील, भूषण पिंपळे, भूषण  पिसाळ, मयुरेश्वर ताकवणे यांच्यासह  अन्य सुमारे पन्नास कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव  करण्यात आला.
सूत्रसंचालन विठ्ठल चोपडे यांनी केले. प्रास्ताविक  गणेश वारे यांनी तर आभार श्रीकांत देशपांडे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील भोंडवे, संतोष भोंडवे, अशोक करमाळे, धनंजय सोळुंके, वैभव देशमुख, राजू अहिवळे , वीरेंद्र सोनवणे, प्रशांत कुंभार, बाळासाहेब दांडे यांनी परिश्रम घेतले.


ही बातमी शेअर करा.