Talegaon Dabhade News : महालसीकरण अभियानास तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 8 हजार नागरिकांचे लसीकरण

ही बातमी शेअर करा.

Talegaon Dabhade News : महालसीकरण अभियानास तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 8 हजार नागरिकांचे लसीकरण
Pckhabar- तळेगाव शहरात आयोजित केलेल्या कोरोना प्रतिबंधक महालसीकरण अभियानास तळेगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  लस घेण्यासाठी शहरातील लसीकरण केंद्रावर प्रचंड रांगा लागल्या होत्या. एक दिवसात 8 हजार 2 नागरिकांनी लस घेतली

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय, वडगाव मावळ यांच्यामार्फत शहरात 19 ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती.

या अभियानात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, तालुका वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत लोहोर, तालुका समन्वयक डॉ. गुणेश बागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.उन्मेष गुट्टे, डॉ. मिलिंद सोनवणे, डॉ.इंद्रणील पाटील, डॉ. दिनेश महालंगे, डॉ, जयश्री ढवळे, याबरोबर नर्सेस,आशासेविका आदींनी नियोजन केले.
या महालसीकरण अभियानातील लसीकरण केंद्राला आमदार सुनिल शेळके, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, गणेश खांडगे, नगरसेवक निखिल भगत, अमोल शेटे,लायन्स क्लबचे डिस्टिक गव्हर्नर दीपक शहा, अध्यक्ष दीपक बाळसराफ यांच्यासह आदींनी लसीकरण केंद्राला भेटी दिल्या.

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना चहा, पाणी, नाष्ट्याची व्यवस्था तळेगाव स्टेशन परिसरामध्ये जनसेवा विकास समितीच्या वतीने तर गाव भागांमध्ये लायन्स क्लब व अन्य संस्थांच्या माध्यमातून काही ठिकाणी करण्यात आली होती.


ही बातमी शेअर करा.