IPL 2021 News : दिल्लीचा हैद्राबाद सनरायर्सवर दिमाखदार विजय

ही बातमी शेअर करा.

IPL 2021 News : दिल्लीचा हैद्राबाद सनरायर्सवर दिमाखदार विजय

Pckhabar- इंडियन प्रीमीयर लीगमध्ये बुधवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेटने पराभवाची धुळ चारत दणदणीत विजय मिळवला. आणि गुणतालिकेत 14 गुणांसह पहिल्या स्थानावर दिल्लीने कब्जा केला.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात  हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून अब्दुल सामदने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याचबरोबर राशिद खानने २२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

१३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या. तर शिखर धवनने ४२ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रिषभ पंतने नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीने १७.५ षटकांत २ विकेट्स १३९ धावा करत सामना जिंकला. हैदराबादकडून खलील अहमद आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.


ही बातमी शेअर करा.