Dehugaon News : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

ही बातमी शेअर करा.

 

Dehugaon News : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त देहूगाव येथील संत तुकाराम विद्यालय व कै. शंकरराव मोरे ज्यु.कॉ.देहू ,भाग शाळा सुदुंबरे , संत जिजाबाई कन्या विद्यालयात कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी देणगीदार नारायणराव मोरे , माजी सरपंच रत्नमाला करंडे ,देहूचे माजी सरपंच कांतिलाल काळोखे, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली काळोखे, माजी विभागीय अधिकारी निम्हण साहेब उपस्थित होते.

देहू नगरपंचायतच्या वतीने मुख्य लिपीक वाळके साहेब ,अभंग प्रतिष्ठानचे प्रा.विकास कंद , सचिन कुंभार व कार्यकर्ते यांनी अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी टिळेकर , काळोखे, भसे वरिष्ठ लेखनिक बागल सर व इतरांच्या हस्ते प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद यादव , मुख्याध्यापिका सुनंदा वडाळकर , रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य तथा पर्यवेक्षक आनंदराव तांबे, उपमुख्याध्यापक भंडारे सर, पर्यवेक्षक विद्या कांबळे, सर्व सेवकवर्ग उपस्थित होते.


ही बातमी शेअर करा.