Wakad Crime News : पतीचे शेजारी राहणार्‍या महिलेशी असलेले संबंधाचा जाब विचारणार्‍या पत्नीला मारहाण

ही बातमी शेअर करा.

Wakad Crime News : पतीचे शेजारी राहणार्‍या महिलेशी असलेले संबंधाचा जाब विचारणार्‍या पत्नीला मारहाण

Pckhabar- पतीचे शेजारी राहणार्‍या महिलेशी असलेले संबंध माहित झाल्यानंतर पतीला जाब विचारणार्‍या पत्नीला पतीने मारहाण केली. तसेच सासू, सासर्‍यांनी घर बांधण्यासाठी माहेराहून 15 लाख रूपये घेऊन ये नाहीतर आम्ही  तुला नांदवणार नाही, असे म्हणत मारहाण केली. हा प्रकार 2013 पासून 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र लक्ष्मण दगडे (वय-39), योगेश लक्ष्मण दगडे (वय-35), सासरे लक्ष्मण अण्णा दगडे (वय-60), सासू आणि ननंद (सर्व रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे शेजारच्या महिलेशी प्रेमसंबंध असल्यावरून त्यांनी पतीला याचा जाब विचारला. यामुळे चिडलेल्या पतीने विवाहितेला हाताने मारहाण केली. सासू, सासर्‍यांनी घर बांधण्यासाठी माहेराहून 15 लाख रूपये घेऊन ये नाहीतर आम्ही  तुला नांदवणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.