Shravan Special : जाणून घेऊया दुसऱ्या तीन ज्योतिर्लिंगांचं  महत्त्व आणि त्यांची महती!

ही बातमी शेअर करा.

Shravan Special : जाणून घेऊया दुसऱ्या तीन ज्योतिर्लिंगांचं  महत्त्व आणि त्यांची महती!

Pckhabar- महादेवांच्या भारतातील प्रमुख 12 मंदिरांना 12 ज्योतिर्लिंगे म्हणतात. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगे आहेत. आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी गेल्या सोमवारी 3 ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेतली होती. आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारनिमित्त तीन ज्योतिर्लिंगांची माहिती घेऊ. यामध्ये मध्य प्रदेशातील ॐकारेश्वर, महाराष्ट्रातील
परळी वैजनाथ, भीमाशंकर यांची माहिती जाणून घेऊ.

4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश – ओंकारेश्वर) –

ॐकारेश्वर मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये शिवपुरी नामक बेटावर वसलेले असून मोरटक्का गाव पासून जवळपास २० कि.मी. अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह ॐ च्या आकारामध्ये बनले आहे. येथे दोन मंदिरे आहेत,  ॐकारेश्वरआणि अमरेश्वर.

ॐकारेश्वर ची निर्मिती नर्मदा नदी पासून झाली आहे. ही नदी भारताची अत्यंत पवित्र नदी आहे. राजा मान्धाता ने येथे नर्मदा किनारी घोर तपस्या करून भगवान शिव ला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले.  येथे एकूण ६८ तीर्थ असून येथे ३३ कोटी देवता राहतात अशी कल्पना आहे. याशिवाय येथे २ ज्योतिस्वरूप लिंग यासहित १०८ प्रभावशाली शिवलिंग आहेत. शास्त्र मान्यता अशी आहे की कोणीही तीर्थयात्री देशाची भले ही सारे तीर्थ करून घेऊ दे परंतु जोपर्यंत तो ओंकारेश्वर येऊन केलेल्या तीर्थों चे जल आणून येथे नाही चढवत तोपर्यंत त्याचे सारे तीर्थ अधूरे मानले जातात.

5. परळी वैजनाथ (महाराष्ट्र – परळी)

भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाहीपण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

6. भीमाशंकर  (महाराष्ट्र – भीमाशंकर)-  

भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. मंदिराबाबत असे म्हणतात की, १८ व्या शतकात नाना फडणीसानी हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. `भीमा’ नदीचा उगम आणि श्री महादेवाचे – शंकराचे स्थान, म्हणून याला `भीमा-शंकर’ असे म्हणतात.भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण असून मंदिराच्या आजुबाजुचा परिसर – डोंगरदर्‍यांनी युक्त, दाट जंगलांचा असा – निसर्गरम्य आहे. हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.


ही बातमी शेअर करा.