Bhosari News: झुंज अपयशी! 16 कोटींचे इंजेक्शन देऊनही वेदिका शिंदेचा मृत्यू

Bhosari News: झुंज अपयशी! 16 कोटींचे इंजेक्शन देऊनही वेदिका शिंदेचा मृत्यू

Pckhabar- Spinal Muscular Atrophy या जनुकीय आजाराने ग्रस्त असलेल्या भोसरीतील चिमुरडी वेदिका शिंदेला अमेरिकेतून तब्बल 16 कोटींचे इंजेक्शन दिल्यामुळे जगण्याची नवी अशा निर्माण झाली होती. दुर्दैवाने काल 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी वेदिकाचा मृत्यू झाला. सायंकाळी ती खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केला. मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही.

वेदिकावर उपचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले.  16 कोटी रुपयांचे इंजेक्शन मिळावं यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप धडपड करत लोकवर्गणीतून हे पैसे जमा करण्यात आले.

पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा (Zolgensma) ही लस देण्यात आली होती. मात्र, एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत.

वेदिकाला होता असाध्य आजार वेदीका

पाच महिन्यांची असताना तिला SMA टाईप-1, या जनुकीय आजारानं ग्रासल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे वय वाढण्याबरोरब तिच्या शरीरातील एक-एक अवयव निकामी होत होता. त्यामुळे उपचार करणं अत्यावश्यक होतं. या आजारावर मात करण्यासाठी झोलगेन्स्मा ही एकमेव लस उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *