Talegaon Dabhade News: चिपळूण पूरग्रस्तांना दोन ट्रक अत्यावश्यक साहित्य रवाना
Pckhabar- रत्नागिरी, चिपळूण येथील
पूरग्रस्तांना जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांच्या सहकार्याने कपडे, बिस्कीट, लाडू, पाण्याच्या बॉटल, तेलाचे डब्बे, गहू, तांदूळ, दूध पॉवडर, साबण, कोलगेट, फिनेल, ब्लॅंकेट, चिक्की आदी जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक रविवारी सायंकाळी 7 वाजता रवाना करण्यात आले.
याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, कल्पेश भगत, मिलिंद अच्युत, अनिल कारके, मनिष शेळके, रमेश भोंग, गोरख कार्ले, सागर दाभाडे, अविनाश बोडके, सचिन मुळे, प्रणय बुरांडे आदी उपस्थित होते.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे म्हणाले” नैसर्गिक संकटात असलेल्या आपल्या बांधवांना मदत करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे.पूरग्रस्तांना 12 हजार पाण्याच्या बाटल्या, 2 टन खाण्याच्या वस्तू, 1 टन चिक्की, 1 टेम्पो कपडे असे आदी अत्यावश्यक साहित्य पाठविण्यात आले आहे.”
मावळ तालुक्यातील पहिलीच भरघोस मदत पाठविताना आम्हाला समाधान वाटत आहे. आणखी मदत लागली तरी आम्ही सज्ज असल्याचे आवारे म्हणाले.










Leave a Reply