पवना धरणात  ६.८९ टक्के पाणीसाठ्यात वाढ

पवना धरणात  ६.८९ टक्के पाणीसाठ्यात वाढ
24 तासात 54 मिमी पाऊस; 

Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान  भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे.  त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून  ६.८९ टक्के वाढ झाली आहे.

#गेल्या २४ तासात झालेला पाऊस = ५४ मि.मि.

#१ जूनपासून झालेला पाऊस = ७१८ मि.मि.

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = *२,६५१ मि.मि.

#धरणातील सध्याचा पाणीसाठा = ४२.१८ टक्के

#गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = ९२.२७ टक्के

#गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= ३.४७ टक्के

#१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ६.८९ टक्के