विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नेहरुनगर, बालनगरीतील कोविड सेंटरच्या कामाची केली पाहणी

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नेहरुनगर, बालनगरीतील कोविड सेंटरच्या कामाची केली पाहणी

Pckhabar – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने नेहरूनगर व बालनगरीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरच्या कामाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज (बुधवारी) पाहणी केली. तसेच काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 15 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होईल असा प्रशासनाचा कयास आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये नव्याने एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे. तर, भोसरीतील बालनगरी येथे 425 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या कामाची आज पाहणी केली. महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुहास दिवसे, शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता संजय घुबे यावेळी उपस्थित होते.