Mumbai News : कोरोनाचे संकट घरोघरी पोहोचवायचे हे काही नेतृत्वाचे लक्षण नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपच्या आंदोलनावर टीका
Pckhabar-कोरोनाची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. मागण्या आहेत हे मान्य आहे. पण सरकार जर तुमचं ऐकत असेल तर संघर्ष कशाला? सध्याच्या काळात मोठ्या संख्येने समाजाला रस्त्यावर उतरवायचं आणि न्याय हक्कासाठी लढा द्यायचा अन् घरी जाताना जे संकट आहे तेचे संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचे लक्षण नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आजच्या आंदोलनावर केली आहे.
कोल्हापुरात सारथी उपकेंद्राचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री हसन मुश्रीफ, शाहू छत्रपती, अशोक चव्हाण यांच्या उपस्थित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला.
मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात मराठा समाजाने दाखवलेल्या संयमाबद्दल भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे कौतुक केले. याचवेळी ठाकरे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले ”कोरोनाचे संकट महाराष्ट्रावर नव्हे, तर संपूर्ण जगावर आहे. आरक्षणाचा प्रश्न आहे हे मान्य आहे. परंतु संघर्षाला रस्त्यावर उतरायचं, न्यायहक्कासाठी गर्दी करायची आणि जे संकट आहे तेच संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचे लक्षण नाही. खरा नेता तोच आहे जो समाजाचे रक्षण चहुबाजुंनी करतो, असेही ठाकरे म्हणाले.










Leave a Reply