Pimpri BJP News: ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन
आमदार महेश लांडगे, माजी मंत्री पकंजा मुंडे पोलिसांच्या ताब्यात
Pckhabar-महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपतर्फे शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरीतही चक्काजाम आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी मंत्री पकंजा मुंडे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी ओबीसीके सन्मान मे, भाजप मैदान मे, ऊठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो , निर्वाचित निवडणूक निरस्त करून ओबीसी संपवायचा राजकीय डाव?, असे फलक कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतले होते.










Leave a Reply