Pimpri News : खंडीत विजपुवठ्यामुळे चिखलीतील लघुउद्योजक हैराण; आंदोलनाचा इशारा

Pimpri News : खंडीत विजपुवठ्यामुळे चिखलीतील लघुउद्योजक हैराण; आंदोलनाचा इशारा

Pckhabar- चिखली, कुदळवाडी, पवारवस्ती या भागात सूक्ष्म आणि लघु उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. येथील उद्योजकांना मोठ्या कंपन्यांच्या ऑर्डर वेळेवर पुरवायच्या असतात. गेल्या महिनाभरापासून या परिसरात विजपुरवठ्यामध्ये व्यत्यय येत आहे.  विद्युत पुरवठा खंडित होऊन चार चार तास यंत्रे, मशीन बंद होतात. अंड रग्राऊंड केबल जळणे फ्यूज जाणे, रोहित्र उडून संपूर्ण वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे चिखली परिसरातील विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लघु उद्योजक संघटनेचे संचालक भारत नरवडे यांनी दिला आहे.

कोट्यवधी रुपयांची दरमहा आम्ही वीज बिले भरतो, वीज पुरवठा खंडित झाला की आमच्या कामगारांना बसून राहावे लागते, असे लघु उद्योजक संघटनेचे संचालक भारत नरवडे यांनी सांगितले.

संघटनेचे संचालक नवनाथ वायाळ म्हणाले की, स्टील आणि कच्या मालाच्या किमती 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दिड वर्षे लॉकडाऊनचा परिणाम  उद्योगावर झाला आहे. आम्हाला अखंडित वीजपुरवठा झाला तरच उत्पादन परवडते. वेळेत डिलिव्हरी दिली नाही की, आमची प्रतिमा खराब होते. आम्ही 11 रुपये प्रति युनिट वीज बिल भरतो, मग आम्हाला महावितरण व्यवस्थित सेवा का देत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संघटनेचे सचिव जयंत कड म्हणाले की, अचानक वीज खंडित होते. जॉब रिजेक्ट होतात. कटर, आणि किमती टूल्स तुटतात. मशिनरीचे नुकसान होते,वर्क सेटिंग, जॉब रिवर्कचा खर्च वाढतो. महावितरणला निवेदने देऊनही अधिकारी दुर्लक्ष करतात.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपली सेवा सुधारावी. अखंडित वीजपुरवठा करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भारत नरवडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *