Dehu News : देहूकरांचा उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होणार
Pckhabar- 58 लाख रूपये वीजबिल थकल्यामुळे देहूकरांचा दोन दिवसांपासून बंद असलेला पाणी पुरवठा उद्या (शनिवार) पासून सुरळीत होणार आहे. नगरपंचायत प्रशासनाने महावितरणला बिल अदा केलेल्यामुळे विज पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र देहूगावच्या पुरवठा योजना, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि पथदिव्यांचे वीजबिलापोटी तब्बल ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने दुसऱ्यांदा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून देहूकरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
अखेर प्रशासनाने महावितरणला पैसे अदा केल्याने विज जोडण्यात आली आहे. उद्या (शनिवार) पासून देहूगाव परिसराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.










Leave a Reply