Pune News : यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम; उपमुख्यमंत्री उद्या घेणार आढावा
Pckhabar- पंढरीच्या सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी शेकडो वर्षापासून निघणाऱ्या पालखी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम असून, या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उद्या (शुक्रवार) पुण्यात बैठक घेण्यार आहेत.
या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा असलेला पालखी सोहळा दरवर्षी नित्यनेमाने मोठ्या भक्तीभावाने आळंदी आणि देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. वीस दिवसांच्या काळात वाटेवरच प्रत्येक गावातील नागरिक टाळ, मृदंग आणि अभंगात तल्लीन होतात.
गतवर्षी कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला. यंदाही या सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक पालखी सोहळा रद्द होणार की नाही, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी राज्यातील अन्य जिल्ह्यात परिस्थिती अद्यापही गंभीरच आहे. प्रशासनाकडून कोरोनाच्या तिसरी लाट अधिक गंभीर असल्याचे इशारे दिले जात आहेत.










Leave a Reply