Bhosari crime news: फुगेवाडीत मोटार चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या त्रिकुटाचा धुमाकूळ

Bhosari crime news: फुगेवाडीत मोटार चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या त्रिकुटाचा धुमाकूळ
Pckhabar- फुगेवाडी येथील जकात नाका परिसरात पहाटेच्या वेळी एक त्रिकुट मोटार चालकांना दमदाटी, मारहाण करत लुटणार करत आहे. एकाच दिवशी या परिसरात लुटमारीच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये या परिसरातून जाताना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिल्या घटनेप्रकरणी जितेंद्र यलगुन गायकवाड (वय-33, रा. नागपुर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अनोळखी तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास फुगेवाडी येथे घडली. फिर्यादी यांच्या टेम्पोला अचानक दुचाकी अडवी लावून तिघांनी त्यांना मारहाण करून 10 हजापांची मोबाईल 8 हजारांची रोकड असा 18 हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला.
दुसर्‍या घटनेप्रकरणी नितीन वैजनाथ केदार (वय-24, रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता पुणे- मुंबई महामार्गावरून फुगेवाडी जकात नाका परिसरातून मालवाहू पॅगो (एमएच-12, क्युआर 9290) भाजीपाल घेऊन जात होते. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून पॅगो थांबविला. कोयता दाखवून नितीन यांना आम्हाला पार्टी करायची आहे, पैसे दे  असे म्हणत शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. उलटा कोयता मांडीवर मारून त्यांच्या खिशातील चार हजारांची रोकड जबरदस्तीने काढून लुटून नेली. तसेच पॅगोची काच फोडून नुकसान केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, पहाटेच्या वेळी पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी परिसरात मोटार चालकांना लुटणार्‍या या त्रिकुटाची चालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे भोसरी पोलिसांनी या परिसरात पहाटेच्या वेळी गस्त घालण्याची मागणी चालक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *